मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळाला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 09:39 IST2017-02-20T09:37:22+5:302017-02-20T09:39:55+5:30
मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळाला तडे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 8.30 वाजता रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची रडरड सुरू झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यालय गाठण्याच्या घाईत असणा-या प्रवाशांना या खोळंब्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.