परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचा-यांनी घातला गोंधळ
By Admin | Updated: February 9, 2017 17:23 IST2017-02-09T17:23:37+5:302017-02-09T17:23:37+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी एसटी कर्मचा-यांनी गोंधळ घातला.

परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचा-यांनी घातला गोंधळ
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 9 - विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी एसटी कर्मचा-यांनी गोंधळ घातला. बुधवारी (दि. ८) भिवंडी येथे रिक्षाचालकाने परिवहन महामंडळाच्या कर्मचा-याला मारहाण केली आणि यात या एसटी कर्मचा-याचा मृत्यू झाला होता.
पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सूत्रसंचालन करणा-या सीमा पेठकर यांनी बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, असे सांगताच एसटी कर्मचारी खेळाडूंनी एकच गोंधळ घातला. सुमारे अर्धा तास खेळाडूंनी निषेधाचा नारा देत कार्यक्रम रद्द करण्याच्या किंवा माफी मागण्याची सूचना केली. सूत्र संचालिकेसह एसटी अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर कार्यक्रम पूर्वनियोजनानुसार पुन्हा सुरू झाला.