मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:21 IST2017-07-19T16:13:02+5:302017-07-19T16:21:05+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली आहे.

Traffic collision on the Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

ऑनलाइन लोकमत

चिपळुण, दि. 19-  मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली आहे. चिपळुणजवळ परशुराम घाटात झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्हीही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटात झाड पडून दोन तास उलटले तरीही अजून झाड महामार्गावरून हटविण्यात आलेलं नाही.स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या मदतीने झाड बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. 
 
दरम्यान, महामार्गावर पडलेलं हे झाड हटविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. काही वेळातच झाडं बाजूला करण्यात येइल, अशी माहिती मिळते आहे. 

Web Title: Traffic collision on the Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.