मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात मार्गावरील वाहतूक ठप्प
By Admin | Updated: March 7, 2017 19:42 IST2017-03-07T19:42:16+5:302017-03-07T19:42:41+5:30
सफाळे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबई आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे

मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात मार्गावरील वाहतूक ठप्प
ऑनलाइन लोकमत
सफाळे, दि. 7 - सफाळे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबई आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही मालगाडी मुंबईकडे येत होती. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला असून, दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडल्याने मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे. या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडल्या आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून हलवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.