मध्य रेल्वेमार्गावर पुन्हा वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: June 7, 2016 20:12 IST2016-06-07T20:03:22+5:302016-06-07T20:12:00+5:30
मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावर पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. हार्बर मार्गावरील आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी ताजी असतानात आता मध्य मार्गावर

मध्य रेल्वेमार्गावर पुन्हा वाहतूक विस्कळीत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावर पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. हार्बर मार्गावरील आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी ताजी असतानात आता मध्य मार्गावर पुन्हा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे याचा अनेक प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी- कांजुरमार्गदरम्यान विद्युत पुरवठ्यातील समस्येमुळे अप आणि डाऊन दिशेने जाणा-या लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर या मार्गावरील एक्सप्रेस गाड्याही उशिराने धावत आहेत.