पारंपरिक मासेमारी क्षेत्र मच्छीमारांकरिता आरक्षित ठेवणार - महादेव जानकर
By Admin | Updated: September 20, 2016 02:34 IST2016-09-20T02:34:00+5:302016-09-20T02:34:00+5:30
पारंपरिक मच्छीमारांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असून, या मच्छीमारांकरिता खोल समुद्रात मासेमारी क्षेत्र आरक्षित करण्यात येईल

पारंपरिक मासेमारी क्षेत्र मच्छीमारांकरिता आरक्षित ठेवणार - महादेव जानकर
मुंबई : पारंपरिक मच्छीमारांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असून, या मच्छीमारांकरिता खोल समुद्रात मासेमारी क्षेत्र आरक्षित करण्यात येईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
मढ कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या भेटीवेळी जानकर बोलत होते. हा प्रश्न दिल्ली दरबारीही मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बंदरावरील प्रदूषण, मढ-वर्सोवा नियोजित उड्डाण पूल ही समस्याही मार्गी लावण्यात येतील, असेही आश्वासन जानकर यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबईचे अध्यक्ष किरण कोळी, नगरसेवक अजित भंडारी, मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष हरिशचंद्र आखाडे, धानजी कोळी, कृष्णा कोळी, नगरसेवक दीपक पवार, पांडुरंग कोळी, समाजसेवक संजय सुतार, बाबू सुतार, नवजवान तरुण मंडळाचे अध्यक्ष शांताराम भगत, सचिव जगन्नाथ कोळी, खजिनदार विद्याधर कोळी, सदस्य अंकुश कोळी, महेश पाटील उपस्थित होते.