शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:18 IST

Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.

 नांदेड  - पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर अन् मृतदेह बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा हा ट्रॅक्टर चालवित होता. ही दुर्घटना घडताच तो फरार झाला आहे.

आलेगाव येथील शेतकरी दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात गुंज येथील महिला, पुरुष कामाला येतात. शुक्रवारी पहाटे शिंदे यांच्याकडील अल्पवयीन चालक मुलाने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले. ट्रॅक्टर साडेसात वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. त्यावेळी विहिरीलगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच अल्पवयीन चालकाने उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. पण, दहा जणांसह ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली. 

त्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविता आले. पण, पाण्यात बुडालेल्या सात महिलांचा जीव त्यांना वाचविता आला नाही.

अल्पवयीनाच्या हाती स्टेअरिंग कशासाठी?अल्पवयीन चालक हा अनेक वर्षांपासून दगडोजी शिंदे यांच्या शेतात काम करतो. तो अवघा १६ वर्षांचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग दिलेच कशाला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

मृतांच्या कुटुंबीयांना सात लाखांची मदत जाहीरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयानेही दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  

८० फूट खोल विहिरीत ४० फूट पाणी होते. सर्व जण ट्रॉलीच्या खाली अडकले. त्यावेळी दोन महिला अन् एका पुरुषाच्या हाती विहिरीतील मोटारीचा पाइप लागला. त्याचा आधार घेत ते मदतीसाठी धावा करीत होते. 

‘त्या’ महिलांचे ऐकले असते तर वेळ टळली असती...पाऊस झालेला असल्याने चारीतून ट्रॅक्टर निघणार नाही, चढ-उतार आहे. तिकडे ट्रॅक्टर नको घालू, आम्हाला इकडेच उतरू दे, असे सांगूनही अल्पवयीन चालकाने केलेले डेअरिंग ७ महिलांच्या जीवावर बेतले. त्या महिलांची विनवणी अल्पवयीन चालकाने ऐकली असती तर ही वेळ आलीच नसती, त्याची निष्काळजी अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. या अल्पवयीन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.  

मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश मृतांमध्ये ताराबाई सटवाजी जाधव (३५), सरस्वती लखन बुरूड (२५), चऊत्राबाई माधव पारधे (४५), सपना उर्फ मीना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३०) या पाच महिला आणि धुरपता सटवाजी जाधव (१८), सीमरन संतोष कांबळे (१८) या दोन मुलींचा समावेश आहे. जखमींमध्ये पार्वतीबाई रामा बुरूड (३५), पुरभाबाई संतोष कांबळे (४०), सटवाजी जाधव (५५) या तिघांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात