ट्रॅक्टर व टेम्पोची धडक, १ ठार, १० जखमी
By Admin | Updated: October 12, 2016 14:38 IST2016-10-12T14:38:24+5:302016-10-12T14:38:24+5:30
अकलूजहुन वेळापूरकडे येणा-या ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करीत समोरून येणा-या टमटमला जोराची धडक दिल्याने १ ठार तर १० जखमी झाले.

ट्रॅक्टर व टेम्पोची धडक, १ ठार, १० जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १२ - अकलूजहुन वेळापूरकडे येणा-या ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करीत समोरून येणा-या टमटमला जोराची धडक दिली़ या धडकेत एका महिला जागीच ठार झाली असून अन्य १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत़
अकलूज ते वेळापूर रोडवर खंडाळी गावाच्या शिवारात असलेल्या दुर्गा हॉटेलजवळ (ता़ माळशिरस) याठिकाणी हा अपघात झाला़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अकलूजहुन वेळापूरकडे ट्रक्टर एमएच ४२ टी २००८ या गाडीच्या चालकाने आपल्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवित असताना मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणारी टमटम (एमएच २० एजी ३२८६) यांची समोरासमोर धडक झाली़ या अपघातात अप्साना कचरोद्दीन मुलाणी (वय ४०, रा़ वेळापूर, ता़ माळशिरस) ही जागीच मयत झाली़ तर परवेज कचरोद्दीन मुलाणी, सोफीया कचरोद्दीन मुलाणी (वय १९), जयीत मुसा मुलाणी (वय १४), अजिम मुसा मुलाणी, साकीफ दाऊत मुलाणी (वय १०), तनुजा इसाक शेख (वय १९), रेहान अशपाक मुलाणी (वय ८), विक्रम विठ्ठल पवार (वय २०) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत़
याप्रकरणी सलमान कचरोद्दीन मुलाणी (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे़ वेळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोसई वाडेकर हे करीत आहेत़