समर्पित, नि:स्वार्थी नेतृत्वाची अखेर सा.रे.पाटील यांना विधानसभेची श्रद्धांजली
By Admin | Updated: April 6, 2015 23:21 IST2015-04-06T23:21:40+5:302015-04-06T23:21:40+5:30
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सा.रे.पाटील यांना आज विधानसभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्पित भावनेने राजकारण
समर्पित, नि:स्वार्थी नेतृत्वाची अखेर सा.रे.पाटील यांना विधानसभेची श्रद्धांजली
मुंबई : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सा.रे.पाटील यांना आज विधानसभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्पित भावनेने राजकारण व समाजकारण करणारा एक नि:स्वार्थी नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडताना सा.रे.पाटील यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने एक ज्येष्ठ मागदर्शक गमावला. आपल वैयक्तिक हानीही झाली आहे. अजातशत्रू असा हा नेता होता. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की समाजवादी विचारसरणीचे तहहयात आचरण करणारे सा.रे.पाटील हे सार्वजनिक जिवनातील आदर्श नेते होते. आधुनिक शेती, ऊस उत्पादकांच्या हिताची कारखानदारी त्यांनी केली. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेने उल्हास पााटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. ‘आपण यावेळी सा.रे.पाटील यांच्याविरुद्धध लढलो आणि जिंकलो पण त्या विषयीची कुठलीही कटूता येऊ न देता दोन तासातच त्यांनी माझे अभिनंदन केले, असे उल्हास पाटील
म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)