कमरेला दोर बांधून शेताची डवरणी!
By Admin | Updated: July 7, 2016 02:11 IST2016-07-07T02:11:24+5:302016-07-07T02:11:24+5:30
महिलेची श्रमगाथा; अल्पभूधारक शेतकरी महिलेचा परिस्थितीशी संघर्ष.

कमरेला दोर बांधून शेताची डवरणी!
मंगरुळपीर (जि. वाशिम) : आधीच अल्पभूधारक, त्यातही शेतीकामासाठी बैल नाहीत, पेरलेले पीक डवरणीला आलेले, तेव्हा कुणाकडेही मदतीसाठी हात न पसरता, रंजना हिने कमरेला दोर बांधून डवरणी केली.
मंगरुळपीर तालुक्यातील फाळेगाव येथील अल्पभूधारक दीपक शिंदे यांच्याकडे बैल नाहीत. अशा परिस्थितीत पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी रंजना शेतीत राबत आहे. अशा परिस्थितीत स्वत: दीपक व रंजना कमरेला दोर बांधून शेतात आळीपाळीने डवरणीचे काम करीत आहेत. एका दिवसात एक एकर डवरणी करतात. या दाम्पत्याला एक विवाहित मुलगी आणि एक मुलगा आहे.