काशिद समुद्रात पर्यटक बुडाला; वाचवण्यात यश
By Admin | Updated: September 7, 2015 00:58 IST2015-09-07T00:58:47+5:302015-09-07T00:58:47+5:30
काशिद समुद्र किनारी पुण्याहून फिरण्यासाठी गेलेले पंधरा तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता त्यापैकी अभिषेक गुलानी (२६, रा. नागपूर)

काशिद समुद्रात पर्यटक बुडाला; वाचवण्यात यश
बोर्ली-मांडला : काशिद समुद्र किनारी पुण्याहून फिरण्यासाठी गेलेले पंधरा तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता त्यापैकी अभिषेक गुलानी (२६, रा. नागपूर) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. अभिषेक बुडत असल्याचे लिक्षात आल्यानंतर मित्रांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला वाचविले. बेशुद्ध पडल्याने त्याला बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याला श्वास घेण्याचा
त्रास होवून तोंडातून रक्त बाहेर
पडत असल्याने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी नवघरकर यांनी अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेले. प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले. (प्रतिनिधी)