पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

By Admin | Updated: June 28, 2016 01:56 IST2016-06-28T01:56:18+5:302016-06-28T01:56:18+5:30

पावसाला सुरुवात झाल्याने कार्ला, भाजे, वेहेरगाव या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

Tourist racket | पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

कार्ला : पावसाला सुरुवात झाल्याने कार्ला, भाजे, वेहेरगाव या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. काही मद्यपी, हुल्लडबाज पर्यटकांचा इतर पर्यटक आणि स्थानिकांना उपद्रव होत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.
यापुढचे दोन-तीन महिने विशेषत: शनिवार आणि रविवारी पर्यटकांची गर्दी पावसाळी पर्यटनासाठी होणार आहे. कार्ला, वेहेरगाव येथे काहीजण मुक्कामी येत असतात. मद्यपान, वाद्य वाजवणे, वेडेवाकडे नाचणे, रस्त्यातच वाहन उभे करून वाहनातील स्पीकरवर गाणी लावून नाचणे, रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ओढे-नाल्यामध्ये अश्लीलपणे नाचणे, दारूच्या नशेत आपापसात किंवा दुसरे पर्यटक, स्थानिक नागरिक किंवा दुकानदार यांच्याशी हुज्जत घालणे असे प्रकार होत असतात. अनेकदा याचे पर्यवसान भांडणात होते.
भाजे येथील धबधब्यावर भिजताना पर्यटकांच्या गटात नेहमीच वाद-भांडणे होत असतात. महिला, तरुणी यांच्या सुरक्षेचा विचार करून, तसेच स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पर्यटनस्थळांवर बंदोबस्तासाठी पोलीस नेमावेत. कार्ला फाटा येथे शनिवारी, रविवारी वाहतूक पोलिसाची नितांत गरज
आहे. या ठिकाणी चारही बाजूने
वाहने येतात. बेशिस्त वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने घुसवतात. त्यामुळे अपघाताचा धोका सतत जाणवत असतो. पादचाऱ्यांसाठी तर रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते.
वेहेरगाव, भाजे, कार्ला या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा किमान शनिवार-रविवारी पोलीस
तैनात करावा, अशी मागणी होत
आहे. (वार्ताहर)
पर्यटकांनी पाऊस आणि निसर्गाचा आनंद इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने घ्यावा. पर्यटनस्थळी मद्यपान करू नये. मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी वाहनांची तपासणी करून मद्य आणि इतर अंमली पदार्थ नसल्याची खात्री करावी, अशी मागणीही होत आहे.

Web Title: Tourist racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.