कृषी विद्यापीठातील १,१५९ रोजंदार कर्मचारी सेवेत कायम
By Admin | Updated: March 24, 2015 01:26 IST2015-03-24T01:26:34+5:302015-03-24T01:26:34+5:30
राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील १,१५९ रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच कुशल/अर्धकुशल कर्मचारी यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,
कृषी विद्यापीठातील १,१५९ रोजंदार कर्मचारी सेवेत कायम
मुंबई : राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील १,१५९ रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच कुशल/अर्धकुशल कर्मचारी यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.
त्यासाठी आवश्यक ५९६ अधिसंख्य पदे मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतन व भत्त्यासाठी दरवर्षी ६ कोटी, ४० लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चासही मंजुरी देण्यात आली
आहे. कायम करण्यात आलेल्या या १,१५९ पदांमध्ये कृषी विद्यापीठ
निहाय रोजंदार मजूर आणि कुशल/अकुशल कर्मचारी यांची अनुक्रमे संख्या अशी -
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ : २८३ मजूर व २६३ कुशल/अर्धकुशल कर्मचारी.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ : २५३ + ३१
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ : २३५.