शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात तूर्तास डीजेला बंदी- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 07:03 IST

साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यास नकार

मुंबई : गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि दणदणाट करणाऱ्या साऊंड सिस्टिम वापरणाºयास न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. सण नेहमी येत-जात असतात. सणोत्सवांच्या काळात होणाºया गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही. तुम्ही लेखी हमी दिली, तरी प्रत्यक्षात मिरवणुकीत किती गोंगाट असतो, याची कल्पना आम्हाला आहे, अशा शब्दात न्यायालयाने कानउघाडणी केली.सणांच्या काळात व गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य सरकारने डीजे व साऊंड सिस्टिमचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या परिपत्रकाला प्रोफेशनल आॅडिओ आणि लायटनिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला या बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. पालातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिम वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. सर्व मुद्यांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारला १९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून त्यादिवशी पुढील सुनावणी होणार आहे.सरसकट बंदी घालावी का? सरकारला सवालसाऊंड सिस्टिम वापरण्यास सरसकट बंदी घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही न्यायालयाने सरकारपुढे उपस्थित केला. एका ठराविक मर्यादेइतकाच आवाज असणाºया साऊंड सिस्टिमवरील बंदी शिथिल करण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय आहे, असा सवालही न्यायालयाने केला.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMumbai High Courtमुंबई हायकोर्ट