शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बळजबरीने लग्न करत युवतीवर अत्याचार; महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 09:35 IST

अहमदनगरच्या युवतीचे अपहरण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चौघांना अटक 

संगमनेर (जि. अहमदनगर) : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चार जणांनी संगमनेरमध्ये राहणाऱ्या एका युवतीचे अपहरण केले. यातील एकाने युवतीवर अत्याचार करत तिच्याशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर पुन्हा त्याने अत्याचार केले. युवतीच्या पोटावर सिगारेटचे चटके देऊन तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढत तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

प्रवीण अरुण लगड (२६), संकेत भगवान राणे (२७), दर्शन शिवाजी हिरे (२५), राहुल कैलास वाघमारे (२८, सर्व रा. सिन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास पीडित युवती नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेरमधील एका महाविद्यालयासमोरून जात असताना चौघे आरोपी कारमधून आले. त्यांनी तिला बळजबरीने कारमध्ये बसविले. त्यानंतर तिला सिन्नर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. प्रवीण लगड याने तिला मारहाण केली. उग्र वासाचे थंड शीतपेय बळजबरीने पाजून तिच्यावर अत्याचार केले. तिच्या पोटावर सिगारेटचे चटके देऊन विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले. त्यानंतर १ डिसेंबरला चौघांनी तिला पंचवटी, नाशिक येथे नेले. तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन लगड याने तिच्याशी बळजबरीने लग्न करून लग्नाची नोंदणी करण्याच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर पुन्हा तिला सिन्नर येथील एका लॉजमध्ये नेले. जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत पुन्हा तिचे विवस्त्रावस्थेत फोटो काढले. 

बळजबरीने नेले पोलीस ठाण्यात २ डिसेंबरला युवतीला बळजबरीने सिन्नर पोलीस ठाण्यात नेले. तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन ‘मी माझ्या मर्जीने निघून आलेली असून, मला कोणीही पळवून आणलेले नाही’, असे पोलिसांना सांगण्यास बजावले. पोलिसांनी तसा जबाब लिहून घेत त्यावर तिची सही घेतली. त्यानंतर युवती तिच्या नातेवाइकांसोबत संगमनेर येथे निघून आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पार्टीसाठी जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कारपुणे येथे वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले व तेथे दारू प्यायल्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. युवकाला अटक झाली आहे. शुभम शिंदे (१९) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कात्रज येथील  २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. दोघेही एकमेकांना ओळखतात. शुभमने तरुणीला ५ डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले. सायंकाळी ५ वाजता ती आली. आरोपीने त्याचा मित्र प्रतीक माने व तरुणी यांना तळजाई जंगलात नेले. तेथे तरुणी दारूच्या नशेत असताना शुभम याने तिच्यावर बलात्कार केला.