कोंढव्यात आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार

By Admin | Updated: April 26, 2017 04:11 IST2017-04-26T04:11:48+5:302017-04-26T04:11:48+5:30

कोंढवा परिसरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका आठ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Torture on an eight-year-old boy in Kondvav | कोंढव्यात आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार

कोंढव्यात आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार

पुणे : कोंढवा परिसरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका आठ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हातात दगड घेऊन पीडित मुलाला जिवे मारण्याची धमकीही दोघांकडून देण्यात आली. या प्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि ताब्यात घेतलेले दोन्ही अल्पवयीन कोंढवा परिसरातील एकाच शाळेत शिकण्यास आहेत. ताब्यात घेतलेले दोघे अनुक्रमे ११ व १२ वर्षांचे आहेत. त्यांच्याच शाळेतील पीडित ८ वर्षीय विद्यार्थ्याला त्यांनी शाळेच्या मागील बाजूला नेले आणि तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हातात दगड घेऊन त्याबाबत कोणाला सांगतले, तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला. त्याच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Torture on an eight-year-old boy in Kondvav