राज्य सहकारी बँकेचे शिखर मोबाइल अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:48 IST2017-08-11T00:48:44+5:302017-08-11T00:48:54+5:30
राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, या सभेत बँकेने आपले मोबाइल अॅप लाँच केले आहे.

राज्य सहकारी बँकेचे शिखर मोबाइल अॅप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, या सभेत बँकेने आपले मोबाइल अॅप लाँच केले आहे.
शिखर मोबाइल अॅप असे याचे नाव असून, या अॅप सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना बँकिंगच्या सर्व सेवा मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत. पैसे ट्रान्सफर, बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट, व्यवहारासंदर्भात माहिती जाणून घेणे अशा सर्व सेवा मिळणार आहेत. स्मार्टफोनवरील अॅण्ड्रॉइड, अॅपलच्या आयओएस आणि विंडोज अशा तिन्ही प्रकारच्या आॅपरेटिंग सिस्टीमवर हे अॅप चालणार आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांच्या उपस्थितीत बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेव यांनी बँकेला ४२४ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगितले. बँकेच्या एनपीएमध्येही मोठी घट झाली. तसेच ठेवींमध्येही ४५ टक्के वाढ झाली आहे. या सभेला प्रशासकीय मंडळाचे सदस्य अशोक मगदूम, के.एन. तांबे तसेच नवनियुक्त सदस्य विद्याधर अनास्कर, अविनाश महागावकर आणि संजय भेंडे तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आदी उपस्थित होते.