प्रेयसीला बळजबरीने विष पाजले
By Admin | Updated: February 3, 2016 03:32 IST2016-02-03T03:32:13+5:302016-02-03T03:32:13+5:30
सतत पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीला ‘चल, तुला पैसे देतो’ असे म्हणत मोटारीतून अंबाजोगाई-कळंब रस्त्यावर नेले व बळजबरीने विष पाजल्याची घटना घडली.

प्रेयसीला बळजबरीने विष पाजले
अंबाजोगाई (जि. बीड) : सतत पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीला ‘चल, तुला पैसे देतो’ असे म्हणत मोटारीतून अंबाजोगाई-कळंब रस्त्यावर नेले व बळजबरीने विष पाजल्याची घटना घडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंगरपिंपळा येथील सचिन आजबे याचे गावातीलच सुनीता (नाव बदलले आहे) हिच्याशी सूत जुळले. त्यानंतर सचिनच्या लातूर येथील दुसऱ्या घरात ती राहत होती व तो तिच्याकडे जात असे. घरखर्च तसेच अन्नधान्यासाठी ती सतत सचिनकडे पैशांची मागणी करत असे. तिच्या या तगाद्याला कंटाळून आपला मित्र विठ्ठल गाजरे याला सोबत घेऊन तिच्यासह सचिन गाडीने कळंबकडे निघाला. नंतर रस्ता निर्मनुष्य दिसताच तिला बळजबरीने विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर रुग्णवाहिकेतून सुनीताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीताच्या फिर्यादीवरून सचिन आजबे व विठ्ठल गाजरे यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.