‘टू बी सीएम’ची ‘टेक्नो स्टाईल’
By Admin | Updated: October 30, 2014 00:51 IST2014-10-30T00:51:33+5:302014-10-30T00:51:33+5:30
राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण अन् कायदा याबद्दलचा सखोल अभ्यास वेळोवेळी अनुभवायला मिळाला आहे. परंतु तंत्रज्ञानासंदर्भातदेखील ते कुठेही मागे नाहीत.

‘टू बी सीएम’ची ‘टेक्नो स्टाईल’
ई-चावडीवरील सर्वात ‘अॅक्टिव्ह’ राजकारणी : व्यस्त वेळापत्रकात जगाशी संपर्क
योगेश पांडे - नागपूर
राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण अन् कायदा याबद्दलचा सखोल अभ्यास वेळोवेळी अनुभवायला मिळाला आहे. परंतु तंत्रज्ञानासंदर्भातदेखील ते कुठेही मागे नाहीत.
अनोखी ‘फॅशन स्टेटमेन्ट’ जपणाऱ्या फडणवीस यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच ‘टू बी सीएम’ असणारे फडणवीस राज्यातील ‘यंग मार्इंड्स’च्या विचारसरणीसोबत जुळवून घेतात. त्यांच्या याच ‘टेक्नो स्टाईल’ची यंगिस्तानमध्येदेखील ‘क्रेझ’ आहे.
आधुनिक काळातील गरजेप्रमाणे राजकारणापासून तंत्रज्ञान निराळे राहिलेले नाही. राज्यातील अनेक नेते ‘हायटेक’ आहेत. निवडणूक असो किंवा मतदारसंघातील घडामोडी असोत हे नेते नेहमीच स्वत:ची भूमिका ‘अपडेट’ करीत असतात.
राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात ‘टेक्नोसॅव्ही’ नेत्यांपैकी एक मानण्यात येतात. सुरुवातीपासूनच त्यांची तंत्रज्ञानाकडे ओढ राहिली आहे. इंटरनेट, सोशल मीडिया ही जनतेपर्यंत पोहोचण्याची प्रभावी माध्यमे आहेत हे त्यांनी अगोदरच जाणले होते व त्यामुळेच जनसंपर्काच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणेच ई चावडीचादेखील ते पुरेपूर उपयोग करतात.
त्यांच्यात दडलेल्या राजकारण्याला नवीन पैलू पाडण्याचे काम तंत्रज्ञानाने केले असल्याचेदेखील ते मान्य करतात.
सोशल चावडीवर दैनंदिन ‘अपडेट्स’
अनेक नेते केवळ निवडणुकांपुरतेच इंटरनेटवर ‘सोशल’ होतात. परंतु त्यानंतर मात्र त्यांचे फारसे अस्तित्व जाणवत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपले वेगळेपण सुरुवातीपासूनच जपले आहे. जवळपास दररोजच ते ‘टिष्ट्वटर’, ‘फेसबुक’ यांच्यासारख्या निरनिराळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर ‘अपडेट्स’ टाकत असतात. अगदी हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनादेखील ‘टष्ट्वीटर’वरून शुभेच्छा देत ते हरियाणाला विकासाच्या उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त केला. अनेक नेत्यांचे कार्यकर्ते ‘सोशल अकाऊंट’ सांभाळत असतात. परंतु देवेंद्र हे स्वत: ‘फेसबुक’वर ‘स्टेटस’ टाकतात. त्यांचे स्वत:चे वेगळे ‘पेज’देखील आहे. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी देवेंद्र फडणवीस हे सोशल चावडीवर ‘अॅक्टिव्ह’ असतातच अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
देवेंद्र, तुम्ही असेच राहा!
नगरसेवक, महापौर, आमदार, भाजपा प्रदेशाध्यक्ष अन् आता लवकरच होणारे मुख्यमंत्री! देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रवासात तरुण कार्यकर्त्यांची नेहमीच सोबत राहिली आहे. देवेंद्र यांनी आजपर्यंत कधीही कोणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले नाही. मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर ते प्रत्यक्ष तर भेटू शकणार नाहीत. परंतु ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संपर्कात रहावे व थेट त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ते जसे आहेत तसेच त्यांनी रहावे अशी अपेक्षा धरमपेठ भागातील तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
‘गॅझेट्स’ची आवड
‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही भाजपा कार्यकर्त्यांची घोषणा लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांना नवनवीन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेण्याची आवड आहे. काही काळापूर्वी ‘ब्लॅकबेरी’वर जगाशी संपर्कात राहणारे देवेंद्र यांना आता ‘आयफोन’ने प्रभावित केले आहे. कुठलाही नवीन ‘स्मार्टफोन’ बाजारात आला की देवेंद्र त्याची माहिती घेतात. विशेष म्हणजे ‘व्हॉट्स अॅप’वर ते सातत्याने पक्ष पदाधिकारी, मित्रमंडळी तसेच कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात हे विशेष. यासोबतच विधिमंडळात एखादा नवीन मुद्दा मांडायचा असो किंवा एखाद्या कार्यक्रमात भाषण द्यायचे असो, ते स्वत: इंटरनेटवर त्या विषयाची सखोल माहिती घेतात व ‘नोट्स’ काढतात. ते नेहमी ‘आयपॅड’देखील सोबत ठेवतात. सोबतच अत्याधुनिक लॅपटॉप ते आवर्जून वापरतात.