युवतीची जीभ कापली
By Admin | Updated: August 10, 2015 22:58 IST2015-08-10T22:58:53+5:302015-08-10T22:58:53+5:30
बुलडाण्यातील घटना; अज्ञात युवकाने केला अघोरी प्रकार.
_ns.jpg)
युवतीची जीभ कापली
नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा खुर्द येथील एका १७ वर्षीय युवतीची अज्ञात युवकाने घरात घुसून जीभ कापल्याची घटना सोमवारी घडली. जखमी युवतीवर अकोल्यात उपचार सुरू असून, घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. साळीपुरा भागात राहणारी यशोदाबाई श्रावण खानंदे ही सोमवारी मजुरीसाठी शेतात गेली होती. त्यावेळी तिची मुलगी रेणुका घरी एकटीच असल्याचे पाहून एक अनोळखी युवक तोंडाला काळा रुमाल बांधून घरात घुसला. त्याने दरवाजा बंद करून रेणुकाचे तोंड दाबले, तिची जीभ बाहेर ओढून कापली आणि पळून गेला. रेणुकाची आजी घरी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला. रेणुकावर अकोल्यात उपचार सुरू असून, उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.