बर्थ डेची टोमॅटो ट्रीट

By darshana.tamboli | Published: July 28, 2017 03:05 PM2017-07-28T15:05:30+5:302017-07-28T15:06:51+5:30

अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. छोट्याशा टोमॅटोने सर्वसामान्यांची चांगलीच पंचाईत तर केली आहे अन् गृहिणींचं महिन्याचं बजेटही कोलमडलं आहे.

tomato price rise | बर्थ डेची टोमॅटो ट्रीट

बर्थ डेची टोमॅटो ट्रीट

Next
ठळक मुद्दे अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. छोट्याशा टोमॅटोने सर्वसामान्यांची चांगलीच पंचाईत तर केली आहे अन् गृहिणींचं महिन्याचं बजेटही कोलमडलं आहे.टोमॅटोनं दराची शंभरी गाठली असून, तूर्त तरी त्यात घसरणीची शक्यता नाही.एरवी २0/३0 रुपये किलो मिळणारे टोमॅटो बाजारातूनही नाहीसे झाले आहेत

मुंबई, दि. 28- अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. छोट्याशा टोमॅटोने सर्वसामान्यांची चांगलीच पंचाईत तर केली आहे अन् गृहिणींचं महिन्याचं बजेटही कोलमडलं आहे. टोमॅटोनं दराची शंभरी गाठली असून, तूर्त तरी त्यात घसरणीची शक्यता नाही. एरवी २0/३0 रुपये किलो मिळणारे टोमॅटो बाजारातूनही नाहीसे झाले आहेत. त्यामुळे घरापाठोपाठ हॉटेल्स आणि फास्टफूड सेंटर्सवरूनही टोमॅटो गायब होत चालला आहे. शंभरी पार केलेल्या टोमॅटोचे दर सप्टेंबरपर्यंत असेच वाढलेले राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचं कारण त्याच्या पिकाला ग्रासलेला टोस्पो विषाणू आहे. त्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यानी टोमॅटोचं उन्हाळी पीक घेतलंच नाही व उत्पादन कमी झालं आणि दर गगनाला भिडले. त्यामुळेच मध्यमवर्गानंही महागडे टोमॅटोपासून दूर राहण्याचं ठरवलंय. टोमॅटो, कांदा वा भाजीपाला या साºयांचे भाव वाढायची ही पहिलीच वेळ नव्हे. याआधीही सर्वसामान्यांनी अशा महागाईचा सामना केला आहे. महागाईवर बरंच लिखाणही झालं आहे.
आफ्टरनून या दैनिकात बिझी बी या नावाने स्तंभलंखन करणाºया बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांनी 1991 मध्ये टोमॅटोच्या वाढलेल्या भावावर आपल्या खुमासदार शैलीत लिहिलं होतं. टोमॅटोच्यादरावर खोचक टोमणे लगावले होता. मुलाचा वाढदिवस आणि टोमॅटोची मेजवानी या सगळ्याचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे.

अ‍ॅन एक्झॉटिक टोमॅटो डिश!
काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवशी डिनरमध्ये आम्ही प्रत्येकाने एक-एक टोमॅटो खाल्ला. टोमॅटो आणण्यासाठी मी स्वत: मार्केटमध्ये गेलो होतो. विकत घेतलेले टोमॅटो फार उत्तम होते, असं नव्हे. पण उत्तमच्या जवळपास होते. मार्केटमध्ये असलेल्या उत्कृष्ट टोमॅटोचा दर 40 रुपये तर मी घेतलेल्या टोमॅटोची दर होता 38 रुपये. टोमॅटो घेताना मी ते अगदी नीट चाचपडून पाहिले. टोमॅटोचा रंग, त्वचा तसंच त्याचा आकार अगदी सारं नीट पाहून विकत घेतले. यावर भाजीवाला म्हणाला,'साहेब, तुम्ही सगळ्यात चांगले टोमॅटो निवडले आहेत. पण काही दिवसांनी हे टोमॅटोसुद्धा तुम्हाला बाजारात मिळणार नाहीत. नव्या इंडस्ट्रीअल पॉलिसीमुळे कॉपोर्रेट सेक्टरवर पडलेल्या बोजा पडला असून, परिणामी टोमॅटो बाजारात मिळणारच नाही. एकूणच नव्या औद्योगिक धोरणामुळे वस्तूंच्या दरात कसा बदल आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. हेच सांगण्याचा भाजीवाल्याचा प्रयत्न असावा.
टोमॅटो घरी आणल्यानंतर ते टोमॅटो बॉइल करावे की अंड्याच्या पदार्थात घालावेत, असं बायकोनं मला विचारलं. ते कच्चेच खाल्लेले बरे असं मी सुचवलं. म्हणालो : त्यामुळे टोमॅटोची चव विसरलेल्या मुलांना त्याची चव पुन्हा समजेल.
सर्व चर्चेअंती आम्ही जेवायला बसलो. जेवणात इतरही पदार्थ होते. पण टोमॅटो हीच मुख्य डिश होती. टोमॅटो जेवणाच्या आधी देऊ की शेवटी असा सवाल पत्नीनं केला. त्यावर टोमॅटो सुरूवातीलाच दे, असं मी उद्गारलो. 'मी इतर काहीही खाणार नाही, फक्त टोमॅटोच खाईन', असं माझा मोठा मुलगा डॅरियल म्हणाला. टोमॅटो कमी आहेत. तू केवळ टोमॅटो खाऊन तुझं पोट भरणार नाही, असं मी त्याला स्पष्ट सांगितलं. त्याला डेरेक म्हणाला, आज तुझा वाढदिवस नाहीये, त्यामुळे टोमॅटो खाण्याची तुझी मागणी करणं योग्य नाही. वाढ दिवस माझा आहे. मलाच टोमॅटो अधिक मिळायला हवा.
ही चर्चा ऐकून बायको म्हणाली, प्रत्येकाला समसमान टोमॅटोचा भाग दिला जाईल, पण जो इतर पदार्थ खाणार नाही, त्याला टोमॅटो मिळणार नाही.
टोमॅटोवर चर्चा सुरू असताना आमचा बोल्शॉय द बॉक्सर (कुत्रा) ही त्यात सहभागी झाला. ज्या छान फळाबद्दल तुम्ही बोलत आहात, त्याचा काही भाग मलाही मिळेल का? असं त्यानं विचारलं. त्यावर टोमॅटो हे फळ नसून ती भाजी आहे, टोमॅटो ही दुनियेतील सगळ्यात महागडी भाजी असून ब्रुसेल्स स्प्राऊट्सपेक्षाही ती महाग असते. शिवाय कुत्र्यांना महागड्या भाज्या खायला दिल्या जात नाहीत. तरीही आम्ही तुला देऊ लहानसा भाग, असं मी कुत्र्याला म्हणालो.
आता आपण टोमॅटो कापू, असं बायको म्हणाली. त्यानंतर बर्थ डे बॉय डेरेक टोमॅटो कापेल आणि मग आपण त्याला शुभेच्छा द्यायच्या, असं ठरलं. टोमॅटो कापून झाल्यावर सगळ्यांनी ते चाखले. टोमॅटोची चव मस्त होती. सगळ्यांनी टोमॅटो एन्जॉय केले.
त्यावेळी असे टोमॅटो परत कधी खायला मिळतील, असं डेरेकने विचारलं. मला खोटं बोलायचं नव्हतं. त्यामुळे टोमॅटो परत कधी मिळतील हे तर मी सांगू शकत नाही, पण कदाचित चंद्रशेखर आणि व्ही.पी सिंह पंतप्रधान झाल्यावर मिळू शकतात. असं उत्तर देऊ न मी मोकळा झालो.
बिझी बी
(कारण ते दोघे पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही, अशी त्यांना तेव्हाच खात्री असावी.)
 

Web Title: tomato price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.