टोलप्रश्नी अजित पवारांच्या दारात धरणो आंदोलन

By Admin | Updated: June 21, 2014 00:23 IST2014-06-21T00:23:49+5:302014-06-21T00:23:49+5:30

राजर्षी शाहू जयंतीदिवशी 26 जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दारात कराड येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणो आंदोलन करण्यात येणार आहे.

Tolstoy agitation of Ajit Pawar at the door step | टोलप्रश्नी अजित पवारांच्या दारात धरणो आंदोलन

टोलप्रश्नी अजित पवारांच्या दारात धरणो आंदोलन

>कोल्हापूर : राजर्षी शाहू जयंतीदिवशी 26 जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दारात कराड येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणो आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात बारामतीला आंदोलन करण्यात येईल. याची तारीख नंतर जाहीर करू, असे सांगून 26 जूनला सकाळी नऊ वाजता कार्यकत्र्यानी दसरा चौकात हजर राहण्याचे आवाहन टोलविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
मिरजकर तिकटी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली. कोल्हापूर टोलमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने वाहनासह हजर रहावे. कराडर्पयत जाणारी ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल, असे साळोखे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) 

Web Title: Tolstoy agitation of Ajit Pawar at the door step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.