शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुली बेकायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:55 IST

Mumbai-Pune Expressway Toll : उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; प्रवाशांना भूर्दंड पडत असल्याचा मांडला मुद्दा

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया पार पाडल्याने त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे. प्रकल्पाची रक्कम वसूल न झाल्याने एमएसआरडीसीने आणखी दहा वर्षे प्रवाशांकडून टोलवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या टोलवसुलीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करू नये, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल वसूल करण्यासंदर्भात एमएसआरडीसीने आयआरबीबरोबर केलेला करार ८ आॅगस्ट २०१९ रोजी संपला आहे. मात्र, अद्याप बेकायदेशीररीत्या टोलवसुली करण्यात येत असल्याचा आरोप ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी जनहित याचिकेत केला आहे.

प्रकल्पाची रक्कम वसूल न झाल्याने एमएसआरडीसीने आणखी दहा वर्षे टोलवसुली करण्याकरिता निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याचिकेनुसार, कॅगच्या अहवालानुसार एमएसआरडीसी ४,२६६ रुपये ही प्रकल्पाची रक्कम २००४ मध्येच वसूल करू शकले असते. तसेच ८ आॅगस्ट २०१९ पर्यंत आयआरबीही प्रकल्पाची रक्कम पूर्णपणे वसूल करू शकले असते. मात्र, एमएसआरडीसीने निविदा काढताना चुकीची पद्धत अवलंबल्याने प्रकल्पाच्या रकमेचा भार सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

‘एमएसआरडीसीने निविदा प्रक्रियेचा भाग म्हणून २००४ मध्ये आयआरबीकडून ४,२६६ कोटी रुपये घ्यायला हवे होते. त्याऐवजी एमएसआरडीसीने आयआरबीकडून ९१८ कोटी रुपये घेतले. त्याशिवाय राज्य सरकारने एमएसआरडीसीला प्रकल्पाची रक्कम भरून काढण्यासाठी अंदाजे १००० एकर भूखंड दिला. या भूखंडाच्या विक्रीतून किंवा अन्य व्यावसायिक कामासाठी याचा वापर करून एमएसआरडीसीने प्रकल्पाची ४० टक्के रक्कम मिळविणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पाची रक्कम वसूल करण्यासाठी एमएसआरडीसीने टोलवसुली आणखी दहा वर्षे वाढविण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अयोग्य आहे. एमएसआरडीसीच्या चुकीच्या निर्णयाचा भुर्दंड सामान्य प्रवाशांनी का सहन करावा?’ असा सवाल याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला आहे.

वास्तविकता आयआरबीने प्रकल्पाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम टोलवसुलीद्वारे कमविली आहे. त्यामुळे आणखी दहा वर्षांसाठी टोलवसुली करण्याकरिता निविदा काढण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय बेकायदेशीर ठरवावा. तसेच या याचिकेवरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत हलक्या वाहनांचा टोल रद्द करावा, अशी अंतरिम मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेHigh Courtउच्च न्यायालय