मंगळसूत्र विकून बांधलं शौचालय

By Admin | Updated: November 6, 2014 13:17 IST2014-11-06T13:17:07+5:302014-11-06T13:17:07+5:30

सासरच्या घरी शौचालय नसल्यामुळे मंगळसूत्र विकून शौचालय बांधण्याचे कौतुकास्पद पाऊल वाशिमच्या संगीता आव्हाळे या महिलेने उचलले आहे

Toilets sold by Mangalsutra | मंगळसूत्र विकून बांधलं शौचालय

मंगळसूत्र विकून बांधलं शौचालय

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - सासरच्या घरी शौचालय नसल्यामुळे मंगळसूत्र विकून शौचालय बांधण्याचे कौतुकास्पद पाऊल वाशिमच्या संगीता आव्हाळे या महिलेने उचलले आहे. आव्हाळे यांचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळसूत्र देऊन सत्कार केला तसेच गावागावामध्ये शौचालये बांधण्यावर आपण भर देणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.
माहेरच्या घरी शौचालय होते, परंतु सासरी ही सुविधा नसल्यामुळे प्रचंड कुचंबणा होत होती असे आव्हाळे म्हणाल्या. त्यामुळे आपण घरात शौचालय हवा असा हट्ट सासरच्या मंडळींकडे धरल्याचे त्या सांगतात. परंतु घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीमुळे शौचालय बांधणे शक्य नसल्याने दागदागिने व शेवटी मंगळसूत्र विकून शौचालय बांधण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. आव्हाळे यांचे सर्व थरांमध्ये कौतुक होत असून त्यांचा कित्ता गावागावातल्या महिलांनी गिरवावा असे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Toilets sold by Mangalsutra