शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय
By Admin | Updated: November 15, 2014 02:17 IST2014-11-15T02:17:08+5:302014-11-15T02:17:08+5:30
मोडनिंब येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय उभे करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय
माढा (जि. सोलापूर) : मोडनिंब येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय उभे करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
पालखी मार्ग भागातील जाडकर वस्ती येथे प्रियंका आपल्या कुटुंबासमवेत राहत़े मा़ ह़ महाडिक महाविद्यालयात पदवीच्या दुस:या वर्षात शिकणारी प्रियंका हिच्या घरी शौचायल नव्हत़े 2क्13 साली राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित शिबिरात मोडनिंब येथे विद्याथ्र्यानी 4क्क् खड्डे खोदले होत़े त्या शिबिरात प्रियंकाही सहभागी झाली होती़ त्या वेळी तिने जनजागृती तर केलीच; पण घरी आल्यानंतर तिने आईवडिलांना शौचालयाविषयी सांगितल़े
मात्र, पैशाचा ताळमेळ बसत नव्हता़ त्यासाठी 12 हजार रुपये लागणार होत़े माङया खात्यावर 4 हजार रुपये शिष्यवृत्ती जमा झाली होती़ उर्वरित पैसे शेतमजुरीतून जमविले आणि अखेर शौचालय बांधल्याचे प्रियंकाने सांगितले. (प्रतिनिधी)
प्रियंकाचा विवाह निश्चित झाला आह़े विवाहापूर्वी मुलीने आम्हाला शौचालय बांधण्यास प्रवृत्त करून एक कायमची आठवण करून दिली आहे, अशी माहिती प्रियंकाचे वडील विष्णू जाडकर यांनी दिली.