शौचालयांचे पायाभूत सर्वेक्षण ‘ऑनलाईन’
By Admin | Updated: December 28, 2014 23:43 IST2014-12-28T23:43:46+5:302014-12-28T23:43:46+5:30
राज्यात ८६ टक्के काम पूर्ण

शौचालयांचे पायाभूत सर्वेक्षण ‘ऑनलाईन’
वाशिम : शौचालय बांधकामाबाबत करण्यात आलेले पायाभूत सर्वेक्षण राज्यभरात ऑनलाईन केले जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी, राज्यात अद्याप ८६ टक्केच ऑनलाईनचे काम झाले आहे. गाव हगणदरी मुक्त तसेच स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शौचालय बांधकामावर भर दिला जात आहे. गावात एकूण किती कुटुंब आहेत, किती कुटुंबांकडे शौचालय आहेत, शौचालय बांधकामासाठी किती कुटुंब पात्र आहेत याबाबतचे पायाभूत सर्वेक्षण २0१२ मध्ये राज्यभरात करण्यात आले होते. हे सर्वेक्षण ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत या सर्वेक्षणाचा सर्व लेखाजोखा ऑनलाईन करावा लागणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत राज्यात ऑनलाईनची स्थिती सरासरी ८६ टक्क्यापर्यंत होती. कोल्हापूर जिल्ह्याने ९९ टक्के काम पूर्णत्वास नेले आहे. सांगली व हिंगोली जिल्हा प्रत्येकी ९८ टक्के, वर्धा जिल्हा ९७ टक्के, सातारा, जालना व ठाणे प्रत्येकी ९६ टक्के ऑनलाईनची कामे पूर्ण झाली आहेत.