संघाचा तृतीय वर्ष वर्ग आजपासून

By Admin | Updated: May 16, 2016 02:23 IST2016-05-16T02:23:57+5:302016-05-16T02:23:57+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षावर्गाला सोमवारपासून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात प्रारंभ होणार आहे.

From today's third year of class | संघाचा तृतीय वर्ष वर्ग आजपासून

संघाचा तृतीय वर्ष वर्ग आजपासून

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षावर्गाला सोमवारपासून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात प्रारंभ होणार आहे. २५ दिवस चालणाऱ्या या शिक्षावर्गासाठी देशभरातून संघ स्वयंसेवक आले आहेत.
तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचे संघप्रणालीत महत्त्वाचे स्थान आहे. तीन वर्षांअगोदर या वर्गात १२०० च्या आसपास स्वयंसेवकांची उपस्थिती राहायची. परंतु आता मात्र या वर्गात ‘सिलेक्शन’ प्रणाली सुरू झाली आहे. संघाच्या ४१ प्रांतात जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात आली आहे. यंदा या वर्गात देशपातळीहून ८०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: From today's third year of class