शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा
By Admin | Updated: May 31, 2014 22:21 IST2014-05-31T19:42:22+5:302014-05-31T22:21:02+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले.

शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा
मंचर : आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या (१ जून) सकाळी १० वाजता शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी सत्कार समारंभ व विजयी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले. मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा तालुका शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. विजयी मेळावादेखील यावेळी होणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, कल्पनाताई आढळराव पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयराव पवार, बैलगाडा विमा कंपनीचे अध्यक्ष जयसिंग एरंडे, शिवसेना ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले, लक्ष्मणराव काचोळे, महिला आघाडी तालुका संघटक स्वाती घुले, जि.प. सदस्या अलका घोडेकर, पं.स. सदस्य मनोहर भालेराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व तमाम शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी केले आहे.