शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक

By अतुल कुलकर्णी | Updated: March 23, 2019 06:45 IST

भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती दोन्ही काँग्रेसच्या वतीने दिली गेली आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई -  भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती दोन्ही काँग्रेसच्या वतीने दिली गेली आहे.एकूण ४८ जागांपैकी काँग्रेसने २६ आणि राष्टÑवादीने २२ जागा लढविण्याचा निर्णय झाला व दोघांनी आपापले मित्रपक्ष त्यात सामावून घ्यायचे असे ठरले होते. त्यानुसार राष्टÑवादीने २२ पैकी १८ जागांचे उमेदवार जाहीर केले असून अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांच्यासाठी आणि हातकणंगलेची दुसरी जागा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे. ठरल्याप्रमाणे माढ्यातून संजय शिंदे यांना तर उस्मानाबादमधून जगजितसिंह राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.उर्वरित रावेर आणि भंडारा-गोंदिया या दोन जागांचे उमेदवार अद्यापही राष्ट्रवादीने जाहीर केलेले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधी ४ जागा मागितल्या होत्या. शेवटी ते दोन जागांवर तयार झाले. त्यांनी ज्या चार जागा मागितल्या होत्या त्यात वर्धा, शिर्डी, सांगली आणि बुलडाण्याचा समावेश होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांना हातकणंगलेची जागा दिली आणि बुलडाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे नावजाहीर केले.तर स्वाभिमानीने मागितलेल्या उर्वरित तीनही जागा काँग्रेसकडे असताना त्यांनी त्यातील वर्धा आणि शिर्डीचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेस राजू शेट्टी यांना सांगलीची जागा देणार की अन्य दुसरी जागा यावर अजूनही खलबते चालू आहेत.रावेर आणि औरंगाबाद या दोन जागांच्या अदलाबदलीची चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु असून जर औरंगाबादची जागा काँग्रेसने सोडली तर रावेरची जागा राष्टÑवादी काँग्रेसला देईल. अजूनही तोडगा निघालेला नाही. जर काँग्रेसने जागा सोडली तर आनंदच आहे पण नाही सोडली तर आम्ही आघाडी धर्म पाळू असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लोकमतला सांगितले.पालघरची जागा बहुजन विकास आघाडीलाकाँग्रेसने त्यांच्या कोट्यातून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी देण्याचे मान्य केले असून तेथून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी मंत्री व नंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले राजेंद्र गावित हे आता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणाही उद्या अपेक्षीत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस