एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आज सामूहिक सुटी
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
मंजूर झालेल्या कलमांचीही अंमलबजावणी व्हावी याकरीता २६ एप्रिल रोजी सर्व महीला कर्मचारी कामगार जाहीर सुटी घेऊन परीवहन मंत्र्याना भेटणार आहेत.

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आज सामूहिक सुटी
जव्हार : राज्य परीवहन महामंडळात मोठ्या संख्येने असलेल्या महीला कामगार आणि वाहक यांच्या मूलभूत अडचणीकडे लक्ष द्यावे व त्यांच्या कल्याणासाठी मंजूर झालेल्या कलमांचीही अंमलबजावणी व्हावी याकरीता २६ एप्रिल रोजी सर्व महीला कर्मचारी कामगार जाहीर सुटी घेऊन परीवहन मंत्र्याना भेटणार आहेत. यामुळे बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जव्हार बस स्थानकातील १५ महिला वाहक व ५ महिला लेखनिक , सफाई कामगार या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी होणार असल्याची माहिती जव्हार आगारातील एसटी कामगार संघटनेचे सचिव एच.जी. भोये व कार्यध्यक्ष आर.यू. मदने यांनी दिली आहे.
अपुरी अस्वच्छ विश्रामगृहे, कामावर असताना प्रवासी , सहकारी, अधिकारी यांचे कडून होणारी शिवीगाळ, मारहाण, छेडछाड, गरोदरपणाच्या काळात खेड्यापाड्यावर लावण्यात येणाऱ्या ड्यूटी यामुळे होणारे गर्भपात तसेच या अडचणीच्या काळात महिला कमगारांना हलके काम करण्याची कोणतीच तरतूद नाही. असे पत्रकात म्हटले आहे. तर परीवहन मंत्री दिवाकर रावते यानी कामगार करारारातील १२ कलमे ही आर्थिक भार पडणारी आहेत यामुळे मंत्र्यांनीच याप्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे .
मंत्र्याच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २६ एप्रिल रोजी या संघटनेतील राज्यातील महिला कामगार रजा घेऊन परीवहन मंत्र्याच्या भेटीसाठी जाणार आहेत. (वार्ताहर)