आज नीट परीक्षा
By Admin | Updated: May 7, 2017 05:04 IST2017-05-07T05:04:58+5:302017-05-07T05:04:58+5:30
सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा

आज नीट परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रविवार, ७ मे रोजी होणार आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड अथवा सरकारी ओळखपत्र ठेवावे, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. देशभरात ५६ हजार वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. २०१६ मध्ये ७ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. हॉल तिकिटाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत आधार कार्ड अथवा अन्य सरकारी ओळखपत्र बरोबर ठेवावे. याचबरोबर, पासपोर्ट साइज फोटोदेखील ठेवावा. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन गट करण्यात आले आहेत. ए गटातील विद्यार्थ्यांना ७.३० ते ८.३० या वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे, तर बी गटातील विद्यार्थ्यांना ८.३० ते ९.३० या वेळेत प्रवेश मिळणार आहे. ९.३० नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही.
यावर्षी नीट परीक्षेसाठी बोर्डातर्फे ड्रेसकोड जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे, यंदा बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना फुल स्लिव्हजचे कपडे तसेच गडद रंगाचे कपडे घालण्यास परवानगी नाही.