सभापतीपदासाठी आज निवडणूक

By Admin | Updated: April 5, 2017 04:02 IST2017-04-05T04:02:30+5:302017-04-05T04:02:30+5:30

शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे संजय पावशे आणि वैजयंती गुजर घोलप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला

Today's election for chairmanship | सभापतीपदासाठी आज निवडणूक

सभापतीपदासाठी आज निवडणूक


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन आणि शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे संजय पावशे आणि वैजयंती गुजर घोलप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असली तरी बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत याची अधिकृत घोषणा होणार आहे. दुपारी ३.३० आणि ४ वाजता होणाऱ्या या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर डोंबिवलीतील कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारी अर्जांची छाननीही बुधवारी होणार आहे. या निवडणुकीसाठी दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांचे दोन्ही सुपुत्र साई आणि सिद्धार्थ यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी डमी अर्ज दाखल करणारे सिद्धार्थ हे माघार घेतील, असे सांगण्यात येत असलेतरी छाननी प्रक्रियेचा निकाल काय लागतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून छाननी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's election for chairmanship