समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

By Admin | Updated: October 9, 2015 02:01 IST2015-10-09T02:01:16+5:302015-10-09T02:01:16+5:30

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या ब्रेन मॅपिंग

Today's decision on Sameer's brain mapping | समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीबाबतही या वेळी निर्णय होणार आहे.
समीरची न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपत असल्याने त्याला प्रथम वर्ग न्यायाधीश डांगे यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी यापूर्वीच समीरची ब्रेन मॅपिंगची तपासणी करण्याची मागणी न्यायालयात केलेली आहे. समीरच्या संमतीवरच न्यायालयात ब्रेन मॅपिंग तपासणीबाबत न्यायाधीश डांगे निर्णय देणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's decision on Sameer's brain mapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.