‘मैत्रेय’प्रकरणी आज निर्णयाची अपेक्षा

By Admin | Updated: July 11, 2016 05:43 IST2016-07-11T05:43:09+5:302016-07-11T05:43:09+5:30

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मैत्रेय कंपनीचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा जामीन अर्ज

Today's decision on the 'friendhood' | ‘मैत्रेय’प्रकरणी आज निर्णयाची अपेक्षा

‘मैत्रेय’प्रकरणी आज निर्णयाची अपेक्षा

नाशिक : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मैत्रेय कंपनीचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा जामीन अर्ज तसेच इस्क्रो खात्यातील जमा रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे़ ‘मैत्रेय’च्या संचालकांनी इस्क्रो खात्यातील रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र २ जुलै रोजी न्यायालयास सादर केले होते़ त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलीस प्रशासनाने प्राधान्यक्रमानुसार १२५ गुंतवणूकदारांची यादीही न्यायालयात सादर केली आहे़ मैत्रेयविरोधात पोलिसांकडे आतापर्यंत सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांनी तक्रार केली असून, फसवणुकीची रक्कम २६ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तर सत्पाळकर यांनी इस्क्रो खात्यामध्ये ५ कोटी ९ लाख रुपये जमा केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Today's decision on the 'friendhood'