शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आजचा दिवस मोर्चांचा ; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचा-यांचे मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:53 AM

मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महापालिका कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी अशा तीन मोठ्या संघटनांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे.

मुंबई : मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महापालिका कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी अशा तीन मोठ्या संघटनांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसाठी गुरुवार हा मोर्चांचा दिवस ठरणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बºयाच काळानंतर मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. बुलेट ट्रेनला विरोध करत आधी रेल्वे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी-सुविधा देण्याची त्यांची मागणी आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हती.दुसरीकडे महापालिका कर्मचाºयांच्या तब्बल ४० मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्व संघटनांच्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयुक्तांविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर महिन्याभरापासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनीही गुरुवारी सरकारविरोधात राज्यातजेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअंतर्गत मुंबईतही तीव्र आंदोलनाचा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.‘अंगणवाडी ताई’ करणार जेलभरोमानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनीही गुरुवारी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केलेली आहे. शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे अटक करून घेत ‘अंगणवाडी ताई’ आपली ताकद दाखविणार आहेत.४० हजार रुपये बोनसची मागणी करत पालिका कर्मचाºयांनी आयुक्तांविरोधात महापालिका मुख्यालयावर सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.कायम सेवेतील कामगार कमी करून कंत्राटीकरणाची पद्धत अवलंबणारे महापालिका आयुक्त कामगारविरोधी धोरण राबवत असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.या गोष्टीचा रोष व्यक्त करताना बायोमेट्रीक पद्धत रद्द करा, वैद्यकीय सुविधा लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी सीएसएमटी येथे शक्तिप्रदर्शन करतील.राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले. खुद्द राज ठाकरे यांनीही बुधवारी फेसबुकवर पोस्ट टाकत हा मोर्चा केवळ मनसेचा नसून, सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो सिनेमागृहासमोरून सकाळी ११.३० वाजता सुरू होणारा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देईल. दरम्यान, मोर्चाला कोणतेही गालबोट न लावता शिस्तीत काढण्याचे आवाहन राज यांनी केले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे