औरंगाबादला आज काँग्रेसची दुष्काळी परिषद
By Admin | Updated: November 30, 2014 01:27 IST2014-11-30T01:27:14+5:302014-11-30T01:27:14+5:30
मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रविवारी औरंगाबाद येथे दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

औरंगाबादला आज काँग्रेसची दुष्काळी परिषद
मुंबई : मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रविवारी औरंगाबाद येथे दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
कासलीवाल-तापडिया ग्राउंड माहेश्वरी भवन येथे सकाळी 11 वाजता परिषदेला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या परिषदेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. राजीव सातव यांच्यासह मराठवाडय़ातील काँग्रेसचे सर्व आमदार, सर्व जिल्हा काँग्रेस कमिटींचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)