आजपासून उडणार प्रचाराचा धुराळा!
By Admin | Updated: October 3, 2014 22:57 IST2014-10-03T22:57:50+5:302014-10-03T22:57:50+5:30
नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत.
आजपासून उडणार प्रचाराचा धुराळा!
>ठाणो : नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत. यामध्ये चौकसभा, रॅली, गेट मीटिंग, छोटेखानी मेळावे यावर अधिक भर दिला जाणार असून शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस लागून आल्याने मतदात्यांर्पयत पोहोचण्यासाठी मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार सज्ज झाले आहेत.
येत्या 15 ऑक्टोबर रोजी मतदानाची तारीख असल्याने निवडणुकीचा प्रचार आणि मोर्चेबांधणी करण्यासाठी उमेदवारांकडे केवळ 3क् दिवसांचा कालावधी मिळाला. त्यात आघाडी आणि महायुतीची बोलणी शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडल्याने आधीच हे दिवस वाया गेले आहेत. त्यानंतर, नवरात्रोत्सवाची सुरू झालेली धामधूम यामध्येदेखील नऊ दिवसांचा कालावधी गेल्याने उमेदवारांना आता केवळ 11 दिवसांचाच कालावधी प्रचारासाठी मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 288 जागांच्या निवडणुका या एकाच दिवशी पार पडणार असल्याने स्टार प्रचारकांच्या तारखा मिळविण्यासाठीदेखील ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवारांची रस्सीखेच सुरू झाली आहे. परंतु, अजूनही त्यांचा ताळमेळ जुळून आलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून ठाण्यातील मुख्य सभेचे मैदान म्हणून ओळख असलेल्या सेंट्रल मैदानात शिवसेना, बसपा आणि मनसेच्याच सभांचा उल्लेख आहे. परंतु, नेत्यांच्या तारखांचा घोळ असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे मैदान अद्याप बुक केले नसल्याची माहिती येथील सूत्रंनी दिली. परंतु, असेही बोलले जात आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे गर्दी खेचता येऊ शकणार नसल्यानेही त्यांनी येथे सभा घेण्यास नकारघंटा वाजविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा तारीख निश्चित होत नसल्याने भाजपानेसुद्धा हे मैदान बुक केले नसल्याची माहिती भाजपाच्या सूत्रंनी दिली.