आज युपीएससीची परीक्षा
By Admin | Updated: August 24, 2014 01:08 IST2014-08-24T01:08:26+5:302014-08-24T01:08:26+5:30
संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)तर्फे घेण्यात येणारी सिव्हील सेवा प्राथमिक परीक्षा रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नागपूर शहरात एकूण १० केंद्र बनविण्यात आले आहे.

आज युपीएससीची परीक्षा
शहरात १० केंद्र
नागपूर : संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)तर्फे घेण्यात येणारी सिव्हील सेवा प्राथमिक परीक्षा रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नागपूर शहरात एकूण १० केंद्र बनविण्यात आले आहे. यात नागपूर जिल्हा व विदर्भासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील तीन हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षेच्या पूर्वसंध्येला आयोगाने एक अधिसूचना जारी करीत नागपुरातील एका केंद्राच्या नावात बदल केला आहे. आयोगातर्फे सांगण्यात आले आहे की, उमेदवारांना जारी करण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश पत्रात शहरातील एका केंद्राचे नाव आर.एस.मुंडले इंग्लिश हायस्कूल समर्थनगर वर्धा रोड नागपूर असे लिहिलेले आहे. परंतु केंद्राचे नाव आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज समर्थनगर, वर्धा रोड नागपूर असे वाचण्यात यावे. याशिवाय कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन सत्रात ही परीक्षा होईल. पहिले सत्र सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालेल. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभर तयारी सुरू होती.
परीक्षा नवीन नियमानुसार
ही परीक्षा नवीन नियमानुसार घेण्यात येणार आहे. केंद्रांनाही याची माहिती देण्यात आली आहे. आयोगाने परीक्षार्थ्यांना सांगितले आहे की, प्रश्न पत्र - २ च्या परीक्षण पुस्तिकेत इंग्रजी भाषेतील (वर्ग १० वी स्तर) च्या ज्या प्रश्नांचे हिंदी भाषांतर करण्यात आलेले नाही. ते प्रश्न सोडवू नये. या प्रश्नांचे गुण धरले जाणार नाहीत. (प्रतिनिधी)