आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

By Admin | Updated: April 15, 2017 01:51 IST2017-04-15T01:51:28+5:302017-04-15T01:51:28+5:30

शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून या

From today the second phase of the struggle yatra | आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, १८ एप्रिल रोजी शहापूर येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप होईल.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. भाजप- शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: From today the second phase of the struggle yatra