शिक्षणक्षेत्र संघटनांचे आज शाळा बंद आंदोलन

By Admin | Updated: January 13, 2015 05:08 IST2015-01-13T05:08:52+5:302015-01-13T05:08:52+5:30

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे

Today the school closed movement of educational institutions | शिक्षणक्षेत्र संघटनांचे आज शाळा बंद आंदोलन

शिक्षणक्षेत्र संघटनांचे आज शाळा बंद आंदोलन

मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
राज्य सरकारने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. याविरोधात शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालकांच्या १८ संघटना एकत्रित आल्या असून, त्यांनी मंगळवारी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांनी पुकारलेला बंद मागे घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी राज्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना केले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सर्वांनी बैठक घेऊन तोडगा काढू, असेही आश्वासन तावडे यांनी दिले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today the school closed movement of educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.