आज राष्ट्रपती वर्धेत

By Admin | Updated: November 26, 2014 01:09 IST2014-11-26T01:09:37+5:302014-11-26T01:09:37+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येथील शिक्षा मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी वर्धेत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली असून चोख पोलीस

Today, President Vedhat | आज राष्ट्रपती वर्धेत

आज राष्ट्रपती वर्धेत

बापूकुटीला भेट देणार : शिक्षा मंडळाच्या शताब्दी समारोहाला प्रमुख उपस्थिती
वर्धा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येथील शिक्षा मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी वर्धेत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. तेथून मुख्य समारोहाला ते उपस्थित राहतील. यानंतर बजाजवाडीला भेट देतील. तेथे पंडित जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वास्तव्य केलेल्या खोल्यांना भेट देऊन महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात जातील. आश्रमात सायंकाळी होणाऱ्या प्रार्थनेत ते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, त्यांच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. शिवाय सेवाग्राम येथे तयार होणाऱ्या ‘गांधी फॉर टुमारो’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा ते घेणार आहेत. येथूनच सेवाग्राम येथे तयार केलेल्या विशेष हेलिपॅडवरून त्यांचे प्रस्थान होईल. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमादरम्यान सेवाग्राम आश्रम अभ्यागतांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Today, President Vedhat