महाविद्यालय प्रवेशाचा आज शेवटचा दिवस
By Admin | Updated: June 30, 2016 00:45 IST2016-06-30T00:45:39+5:302016-06-30T00:45:39+5:30
अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित
_ns.jpg)
महाविद्यालय प्रवेशाचा आज शेवटचा दिवस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडतील, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.
याआधी अकरावीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली होती. त्यात १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र दोन दिवसांत यांपैकी केवळ ८९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. नाहीतर उरलेले विद्यार्थी प्रवेश
प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशासाठी गुरूवारी महाविद्यालयांच्या प्रांगणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जात नोंदविलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर अनेकांना
दुसऱ्या ते पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. मात्र पहिल्या यादीत नाव निश्चित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाही तर संबंधित विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल. प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी आहे. तरी ४ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.