शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:26 IST

Mumbai News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे दोन स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांतून दोन्ही सेना शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

 मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे दोन स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांतून दोन्ही सेना शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्धवसेनेच्या महामेळाव्याला उद्धव ठाकरे, तर शिंदेसेनेच्या बीकेसीतील मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतरचे दोन्ही सेनांचे हे पहिलेच मेळावे आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या  जयंतीनिमित्त कलानगरमध्ये दोन्ही सेनांनी बॅनरबाजी केली आहे. उद्धवसेनेचे विभागप्रमुख आ. अनिल परब यांनी लावलेल्या बॅनर्सवर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, तर शिंदेसेनेचे नेते कुणाला सरमळकर यांनी बीकेसीत होणाऱ्या शिवोत्सव मेळाव्याचा उल्लेख बॅनर्सवर केला आहे. दोन्ही सेनांच्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविषयी उत्सुकताविधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या उद्धवसेनेच्या या पहिल्या महामेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते काय भाष्य करतात, कोणती घोषणा करतात, याची शिवसैनिकांसह राजकीय निरीक्षकांना उत्सुकता आहे. शिवसेना नेत्यांसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहतील. यावेळी शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारी छायाचित्रे आणि चित्रफीत दाखवली जाणार आहे, अशी माहिती उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी दिली. 

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा होणार नागरी सत्कारबीकेसीत होणाऱ्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्याची प्रतिज्ञा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, असे म्हटले होते. मात्र, आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे. केवळ तुष्टीकरणाचे राजकारण उद्धवसेनेकडून होत आहे, त्यामुळे त्यांनी दिवंगत बाळासाहेबांची माफी मागावी, असे त्या म्हणाल्या.

शिंदेसेनेची उद्यापासून राज्यभर आभार यात्राविधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने शिंदेसेनेला भरभरून प्रेम दिले. जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ जानेवारीपासून राज्यात आभार यात्रा सुरू करणार आहेत. राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुती म्हणूनच एकत्र जाणे ही पक्षाची धारणा असल्याचेही शायना एन. सी. यांनी सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना