अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आजपासून
By Admin | Updated: June 23, 2014 03:43 IST2014-06-23T03:43:10+5:302014-06-23T03:43:10+5:30
देशातील आयआयटी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स या परीक्षांचा निकाल जाहीर

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आजपासून
मुंबई : देशातील आयआयटी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत प्रवेशासाठीचे आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ जून ते ३ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता
येतील. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) जाऊन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एआरसी केंद्रांची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल; तर अंतिम यादी ९ जुलै रोजी जाहीर होईल. (प्रतिनिधी)