मेट्रो-३चे आज भूमिपूजन
By Admin | Updated: August 26, 2014 04:15 IST2014-08-26T04:15:19+5:302014-08-26T04:15:19+5:30
विधानसभा निवडणूकीसाठीच्या आचारसंहितेचे ‘काऊंटडाऊन’सुरु झाल्याने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केद्र व राज्य सरकारकडून विविध प्रकल्पाच्या घोषणा व शुभारंभासाठी स्पर्धा लागली आहे

मेट्रो-३चे आज भूमिपूजन
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठीच्या आचारसंहितेचे ‘काऊंटडाऊन’सुरु झाल्याने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केद्र व राज्य सरकारकडून विविध प्रकल्पाच्या घोषणा व शुभारंभासाठी स्पर्धा लागली आहे.त्यामुळे अद्याप निविदेची प्रक्रिया पुर्ण झाली नसताना कुलाबा ते अंधेरी (सीप्झ) या भूयारी मार्गावरील नियोजित मेट्रो-३ चे भूमीपूजन करण्यात येत आहे. सुमारे ३२.५ किलोमीटर लांबीचा महानगरातील पहिला भूयारी रेल असून त्यासाठी तब्बल २३ हजार १३६ कोटी खर्च अपेक्षित आहे.
अंधेरी-घाटकोपर जोडरस्त्याजवळील मरोळ अग्निशमन केंद्राजवळ दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकया नायडू, उपमुख्यमंत्री अजित पवार व ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत .
देशातील आर्थिक राजधानीमध्ये मोनो, मेट्रो-१सेवा कार्यान्वित झाल्यानंतर दळणवळण श्रेत्रातील मेट्रो-३ हे महत्वपूर्ण प्रकल्प आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबर अखेरीस प्रारंभ केला जाणार असून यामध्ये एकुण २७ रेल्वे स्थानकापैकी २६ भुयारी स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो-३ च्या निविदाची प्रकिया व तांत्रीक बाबीची पूर्तता झाल्यानंतर डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. नियोजित २७ स्थानकामध्ये नरीमन पाईट, बीकेसी, अंधेरी, एमआयडीसी, स्वीप्झ
आदी व्यापारी ठिकाणाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)