अकरावी आॅनलाइनची आज दुसरी कट आॅफ
By Admin | Updated: June 30, 2015 03:28 IST2015-06-30T03:28:11+5:302015-06-30T03:28:11+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी कट आॅफ लिस्ट मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये पहिली कट आॅफ ९० टक्क्यांवर गेली होती.

अकरावी आॅनलाइनची आज दुसरी कट आॅफ
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी कट आॅफ लिस्ट मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये पहिली कट आॅफ ९० टक्क्यांवर गेली होती. त्यामुळे दुसऱ्या कट आॅफबाबत विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
कट आॅफचा सर्वाधिक टक्का एनएम कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेसाठी लागला होता. एनएमची पहिलीच कट आॅफ ९३.८१ टक्क्यांवर गेली होती. तर सायन्ससाठी रुईयाची पहिली कट आॅफ ९३.४० टक्क्यांवर स्थिरावली होती. दरम्यान, आर्ट्ससाठी सेंट झेवियर्समध्ये पहिलीच कट आॅफ ९३.८ टक्क्यांवर गेली होती.
अद्याप सायन्ससाठी ९० टक्क्यांवर गेलेल्या कट आॅफमध्ये रुईयासह साठ्ये कॉलेज, वझे-केळकर, रूपारेल, बिर्ला, सेंट झेवियर्स आणि के.जी. सोमय्या या कॉलेजसचा समावेश आहे. तर कॉमर्ससाठी एचआर, पोदार, मिठीबाई, एमसीसी या कॉलेजेसला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांत आर्ट्सलाही पसंती दाखवल्याचे दिसते.