TMC ELECTION RESULT : शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव
By Admin | Updated: February 23, 2017 18:25 IST2017-02-23T16:32:48+5:302017-02-23T18:25:35+5:30
ठाण्यात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांनी धक्का दिला आहे. बाबाजी पाटील यांनी आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा पराभव केला आहे.

TMC ELECTION RESULT : शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाचा पराभव
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 23 - शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांनी धक्का दिला आहे. बाबाजी पाटील यांनी आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा पराभव केला आहे.
ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 29 अ मध्ये शिवसेनेने सुमित भोईर यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जात होता. या निवडणुकीत सुमित भोईर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि मनसेचे दिनेश पाटील यांचे आव्हान होते.
या लढतीमध्ये बाबाजी पाटील यांनी बाजी मारत सुमित भोईर यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का दिला आहे.
आणखी बातम्या