आजारपणाला कंटाळून खारमध्ये तरूणाचा स्वत:वरच गोळीबार
By Admin | Updated: June 5, 2014 23:20 IST2014-06-05T21:53:48+5:302014-06-05T23:20:55+5:30
आजाराला कंटाळून वांद्रयात एका तरुणाने स्व:तावर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

आजारपणाला कंटाळून खारमध्ये तरूणाचा स्वत:वरच गोळीबार
आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई: आजाराला कंटाळून वांद्रयात एका तरुणाने स्व:तावर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हमीद शेख(३३) असे त्याचे नाव आहे. गोळीबारात तो बचावला असून त्याच्यावर वांद्रयाच्या भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रयाच्या रेल्वे कॉलनीत राहाणार्या हमीदला मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे. बरेच उपचार करूनही त्रास कमी होत नसल्याने तो निराश होता. आज सकाळी घरात कोणी नसताना हमिदने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्यातून स्वत:वर फायरिंग करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात गोळी त्याच्या छातीला चाटून गेली. गोळीचा आवाज ऐकून धावत आलेल्या शेजार्यांनी हमीदला रूग्णालयात दाखल केले.
खार पोलिसांनी हमीदकडील कटटा हस्तगत केला आहे. तसेच हमीदविरोधात आत्महत्येचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि त्याचा गैरवापर असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकृती स्थीर होताच त्याला पोलीस अटक करणार आहेत. तूर्तास हा कटटा त्याच्याकडे कसा आला, कोणी दिला याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.