बँकांचे थकीत कर्ज सात वर्षांत नऊपट वाढले!
By Admin | Updated: May 24, 2016 03:36 IST2016-05-24T03:36:36+5:302016-05-24T03:36:36+5:30
गेल्या सात वर्षांत म्हणजे २००८ ते २०१५ या काळात २६ सरकारी बँकांच्या थकीत कर्जात नऊ पट वाढ झाली आहे. २००८ मध्ये सरकारी बँकांची थकीत कर्जे ४० हजार कोटी होती.

बँकांचे थकीत कर्ज सात वर्षांत नऊपट वाढले!
- सोपान पांढरीपांडे, नागपूर
गेल्या सात वर्षांत म्हणजे २००८ ते २०१५ या काळात २६ सरकारी बँकांच्या थकीत कर्जात नऊ पट वाढ झाली आहे. २००८ मध्ये सरकारी बँकांची थकीत कर्जे ४० हजार कोटी होती. ती ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ३ लाख ६१ हजार कोटी झाली आहेत.
हे धक्कादायक वास्तव औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन, ट्रेनिंग व रिसर्च अकादमीने (बेट्रा) प्रकाशित केलेल्या २१ पानी पुस्तिकेवरून उघड झाले आहे. १९९२-९३ ते २००३-०४ पर्यंत थकीत कर्जाची रक्कम ३९ हजार कोटी ते ५६ हजार कोटी दरम्यान होती. त्यानंतर त्यात घट होऊन २००७-०८ थकीत कर्ज ४० हजार ४५२ कोटी झाले होते. २००८ नंतर थकीत कर्ज झपाट्याने वाढू लागले व २०११ नंतर त्यात दरवर्षी ६० हजार ते ७० हजार कोटी रुपयांची भर पडत आहे. अशातऱ्हेने ३१ डिसेंबर 2२०१५ रोजी थकीत कर्ज ३,६१,००० कोटींवर पोहचले आहे.
सर्वच बँकांना फटका
थकीत कर्जवाढीचा फटका सर्वच बँकांना बसला आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी विविध बँकांचे एकूण थकीत कर्ज ३,६१,७३१ होते. (कोटी रु.)
१. अलाहाबाद बँक ९,६११
२. आंध्रा बँक ९,०५१
३. बँक आॅफ बडोदा २७,३५४
४. बँक आॅफ इंडिया ३२,९९५
५. बँक आॅफ महाराष्ट्र ९,४७९
६. कॅनरा बँक १४,८७२
७. सेंट्रल बँक आॅफ इंडिया १७,५६४
८. कॉर्पोरेशन बँक ९,७६०
९.देना बँक ७,६७३
१०. आयडीबीआय बँक १६,७३२
११. इंडियन बँक ५,५९९
१२. इंडियन ओव्हरसीज बँक १९,०५३
१३. ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स १०,०३१
१४. पंजाब अँड सिंध बँक ३,३९१
१५. पंजाब नॅशनल बँक २६,५०१
१६. सिंडीकेट बँक ७,४८१
१७. युको बँक१५,४८१
१८. युनियन बँक आॅफ इंडिया १६,०९८
१९. युनायटेड बँक आॅफ इंडिया ६,११२
२०. विजया बँक ४,०१२
२१. स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर३,०७९
२२. स्टेट बँक आॅफ हैद्राबाद५,८३२
२३. स्टेट बँक आॅफ इंडिया७२,८७१
२४. स्टेट बँक आॅफ म्हैसूर२,९१५
२५. स्टेट बँक आॅफ पतियाळा ५,७८९
२६. स्टेट बँक आॅफ त्रावणकोर२,३८४
(हे कर्ज गेल्या तीन वर्षात दोन लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.)