भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

By Admin | Updated: November 11, 2015 02:05 IST2015-11-11T02:05:06+5:302015-11-11T02:05:06+5:30

मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे

The timetable of Indian Railways has gone bad | भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

मुंबई : मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे. दररोज ४0 हजार मिनिटांपेक्षा जास्त लेटमार्क रेल्वे गाड्यांना लागत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात दररोज ४0 हजार ६७३ मिनिटांचा उशीर झाला असून, आॅगस्ट महिन्यात ३५ हजार ३१८ तर जुलै महिन्यात ४६ हजार ८७६ मिनिटांचा उशीर झाल्याची माहिती देण्यात आली. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष पाहणी मोहीमही हाती घेतली होती, असे सांगण्यात आले. भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडण्यात रेल्वे फाटक हे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फाटकांचे सर्व्हे करून २0१३-१४ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) मध्ये ३१0 आणि २0१४ ते २0१५ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) पर्यंत ३४0 फाटके बंद केली.

Web Title: The timetable of Indian Railways has gone bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.